Chhatrapati Sambhajinagar farmers Diwali advance distribution | जिल्ह्यात २.३९ लाख शेतकऱ्यांना दिवाळी अग्रिमचे ५ हजार मिळाले

शासनाकडून १२० कोटी वितरण, उर्वरितांना २ दिवसांत मिळेल लाभ
money
money pudhari file photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर - राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी अग्रिम ५ हजार रुपये मदत वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी या मदतीचे वितरण सुरू झाले असून दिवसभरात जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ११२ कोटी ६६ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत येत्या दोन दिवसांत मदत जमा होणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सांगितले.

money
Chhatrapati Sambhajinagar AYUSH hospital|जागेच्या वादात अडकले जिल्हा आयुष रुग्णालय

राज्यात कमी पर्जन्यमानामुळे यंदा मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ निर्माण झाला आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे.

money
Chhatrapati Sambhajinagar Cyber Crime : क्वालिटी इन्चार्जला डिजिटल अरेस्ट करून १० लाखांची लूट

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांत मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. पात्र लाभार्थ्यांची निवड करताना अँग्रिस्टॅक प्रणालीतील माहिती आणि फार्मर आयडीच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या डेटाचा वापर करण्यात आला. या माहितीची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यांत मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, मदत वितरणाची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी आणि पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा तसेच तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये वेगाने काम सुरू आहे.

शासकीय सुटीच्या दिवशीही अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. बँक खात्यांत मदत जमा करण्याच्या प्रक्रियेतील उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, हा या मदतीमागील उद्देश आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्पष्ट केले.

पात्र ३.५३ लाख शेतकरी शिल्लक

जिल्ह्यात ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांचा डेटा अपलोड केला आहे, त्याला जिल्हास्तरावरून मान्यता दिली आहे. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली. आता उर्वरित ३ लाख ५२ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसांत मदत जमा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.