Chhatrapati Sambhajinagar education fraud : मणीपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस कॉलेज थाटून विद्यार्थ्यांची फसवणूक

एआयच्या मदतीने बनावट कागदपत्रे; आरोपीच्या पत्नीला अटक, ३ दिवसांची कोठडी
Chhatrapati Sambhajinagar fraud  case
Chhatrapati Sambhajinagar fraud casepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मणीपूरच्या नावाने बोगस जय शंकर कॉलेज थाटून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०२३ ते सप्टेंबर २०२६ या काळात यशवंत कला विद्यालय गारखेडा येथे घडला.

या प्रकरणी मुख्य आरोपी यज्ञेश रामकृष्ण बारहाते (३३) आणि त्याची पत्नी रेणुका भाले (दोघे रा. सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. रेणुकाला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तिला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar fraud  case
Dharashiv News : पंचनामे न झाल्याने संतप्त शेतकऱ्याने सोयाबीन पेटविले

याप्रकरणी २३ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये आरोपी यज्ञेश बारहाते याने गारखेडा परिसरातील यशवंत कला महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता. आपण अहमदाबादला शिक्षक होतो आणि आता मणीपूरच्या एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत बाणेश्वर वेद विद्या प्रतिष्ठानमार्फत जय शंकर कॉलेज सुरू केल्याची बतावणी त्याने केली.

या कॉलेजमध्ये अॅनिमेशनमधील बीएफए, बी. व्होक, डी. व्होक आणि बी.एस्सी. अॅनिमेशन हे कोर्सेस चालवले जात असून, हे केल्यास फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या पगाराची नोकरी लागण्याची हमी त्याने दिली होती. सुरुवातीला यशवंत कला महाविद्यालयाच्या आवारात, नंतर दिशा संकुल (गारखेडा) आणि त्यानंतर विजयनगर येथे जागा बदलून हे बोगस कॉलेज चालवले जात होते.

बनावट कागदपत्रे, बोगस वेबसाईट

तीन वर्षे शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना कोणतेही हॉल तिकीट किंवा मूळ गुणपत्रिका देण्यात आली नाही. संशय आल्याने विद्यार्थिनीसह तिचा भाऊ आणि इतर विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रांची मागणी केली. आरोपींनी दाखवलेले संलग्नता प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे तपासली असता, त्यात व्याकरणाच्या चुका होत्या आणि ती एआयचा वापर करून एडिट केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले. तसेच, त्यांनी दिलेला पत्ता आणि विद्यापीठाचा अधिकृत पत्ता जुळत नव्हता.

Chhatrapati Sambhajinagar fraud  case
Parbhani illegal sand mining : अवैध वाळू उपशावर कारवाईस गेलेल्या महसूल पथकावर हल्ला

विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची लूट

फिर्यादी विद्यार्थिनीकडून आरोपींनी ३ वर्षांत फोनपे आणि रोख स्वरूपात एकूण ९४ हजार ५०१ रुपये उकळले. मात्र, तिला केवळ १३ हजार रुपयांची एकच पावती दिली. सिध्दीसह अन्य सात व अशा अनेक विद्यार्थ्यांची आरोपी यज्ञेश बारहाते आणि त्याची पत्नी रेणुका भाले यांनी संगनमत करून फसवणूक केली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रेणुकाला अटक केली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news