Chhatrapati Sambhajinagar Crime : फूड डिलिव्हरी बॉयचा पीएचडीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

घाटी रुग्णालयाच्या क्वार्टरमधील घटना; रूम शिफ्ट करण्याच्या बहाणा; गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत, रूम शिफ्ट करण्यासाठी सामानाची बांधाबांध करण्याच्या बहाण्याने एका झोमॅटो डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तरुणाने पीएचडीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १२ जुलै रोजी रात्री १० ते १२ वाजेदरम्यान घाटी रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सोमवारी (दि.३) बेगमपुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक मधुकर भुक्तार (३५, रा. पडेगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar doctors strike : ८० टक्के खासगी डॉक्टरांच्या 'बंद'मुळे ओपीडी सेवा ठप्प

गेल्या दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी करणारी मूळ परभणी येथील ३१ वर्षीय विद्यार्थिनी ही फिर्यादी आहे. ती किरायाने खोली करून शहरातच राहते. तिची दोन महिन्यांपूर्वी दीपक भुक्तार याच्याशी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. चॅटिंग, भेटीगाठी होत होत्या. दीपक हा घाटी रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये राहत होता आणि त्याला तेथून दुसरीकडे शिफ्ट व्हायचे होते.

सामान पॅक करण्यासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून दीपकने ८ जुलै रोजी सायंकाळी पीडितेला आपल्या रुमवर नेले होते. तिथे सामान आवरण्यात उशीर झाल्याने आणि दीपकने आग्रह केल्याने ती रात्रभर तिथेच थांबली होती. त्या रात्री त्याने कोणताही गैरप्रकार न केल्याने पीडितेचा त्याच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला. त्यानंतर १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उर्वरित सामान पॅक करायचे आहे, असे सांगून दीपकने तिला पुन्हा खोलीवर नेले.

रात्री उशीर झाल्याने ती पुन्हा तिथेच झोपली. मात्र रात्री १० वाजेच्या सुमारास दीपकने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने तिला एक गोळी खाऊ घातली आणि तिच्या रूमवर नेऊन सोडले.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar EP Plan : ईपी मंजूर; शहराला नकाशांची प्रतीक्षा

या घटनेनंतर त्याने तिच्याशी संपर्कही कमी केला. या भयंकर प्रकारामुळे पीडित तरुणी प्रचंड नैराश्यात गेली होती. बदनामी होईल या भीतीने तिने सुरुवातीला पोलिसांत जाणे टाळले. मात्र विचाराअंती धाडस करून तिने ३ ऑगस्ट रोजी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक मनीषा केदार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news