

Chhatrapati Sambhajinagar division was to get 60 new Lalpari buses.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नव्या धाटणीच्या लालपरी सर्वच विभागांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक बस देण्यातही आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाला ९० नवीन लालपरी मिळणार होत्या. त्यापैकी ६० मिळाल्या आहेत. नुकत्याच आणखी २० लालपरी दाखल झाल्या असून आता बसची संख्या ८० वर गेली आहे.
एसटीच्या ताफ्यातील अनेक गाड्या खिळखिळ्या झाल्यामुळे नवीन लालपरी एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगर विभागाला ९० बस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ८० नवीन बस टप्प्याटप्प्याने येथील ताफ्यात दाखल झाल्या आहेत. नुकत्याच दाखल झालेल्या २० नवीन लालपरीपैकी प्रत्येकी ५ बस देण्यात आल्या आहेत. यात कन्नड-५, सोयगाव-५, फुलंब्री-५, सोयगाव-५ आदी आगारांचा सामावेश आहे.
या सर्व २० बस मिळाल्या आहेत. आता केवळ कोट्यातील १० बस शिल्लक असून यातील ५ मुख्य बसस्थानक व ५ सिडको बसस्थानकाला मिळणार आहेत.
नव्या धाटणीची लालपरी प्रवासासाठी आरामदायी असल्याने ही बस प्रवाशांच्या पसंतीत उतरली आहे. या गाड्या ग्रामीण मार्गावर सेवा देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत आहे.