Chhatrapati Sambhajinagar Crime | जमीन हडपण्याच्या गुन्ह्यात रजिस्ट्री कार्यालयातील दोन कर्मचारी गजाआड!

आतापर्यंतच्या तपासात सात जणांची टोळी असल्याचे निष्पन्न
Chhatrapati Sambhajinagar Crime | जमीन हडपण्याच्या गुन्ह्यात रजिस्ट्री कार्यालयातील दोन कर्मचारी गजाआड!
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : रजिस्ट्री कार्यालय क्र.१ येथील १९७९ मधील शासकीय अभिलेखात कोट्यवधीच्या जमिनीचे फेरफार करून बनावट खरेदीखत तयार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या गुन्ह्यात आरोपींना रेकॉर्ड रूममधील दस्तावेज उपलब्ध करून देणाऱ्या कार्यालयातील अब्दुल रशिद ऊर्फ डॉक्टर अब्दुल रज्जाक (५८, रा.रोशन गेट,अजम कॉलनी),रवींद्र बाबुराव पवार (३८, रा. शिवाजीनगर) या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेने शनिवारी (दि.२८) मध्यरात्री अटक केली आहे.न्यायालयाने या दोघांनाही ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

असा रचला कट

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे पोखरी येथील गट क्रमांक ६६ मधील मयत मूळ मालक बळवंता कुलकर्णी यांची ५.९९ हेक्टर जमीन हडपण्याचा कट आरोपींनी रचला होता. यापूर्वी अटक केलेले आरोपी मोहन दगडू राठोड, नितीन मोहन राठोड, सागर राम आगळे, प्रतीक सुरेश कोहळे आणि प्रशांत प्रकाश तांबे यांनी संगनमताने हा प्रकार केला.

आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-१ मधील सन १९७९ च्या खंड बुक आणि डे-बुकमध्ये दस्त क्रमांक ६०२७ ते २०३०/७९ प्रमाणे बनावट नोंदी घेतल्या. याआधारे मुख्य आरोपी मोहन राठोड याच्या नावाचे बनावट खरेदीखत तयार करून त्याची सत्यप्रत काढली आणि जमिनीवर फेरफार घेण्याचा प्रयत्न झाला. सह दुय्यम निबंधक अधिकारी प्रवीण माणिकचंद राठोड (४४, रा. उल्कानगरी) यांच्या फिर्यादीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रेकॉर्ड रूममधील साहित्य पुरवल्याचे उघड

गुन्ह्याच्या तपासात कार्यालयातीलच कंत्राटी कर्मचारी अब्दुल रशिद आणि रवींद्र पवार यांनी आरोपींना रेकॉर्ड रूममधील १९७९ चे खंड बुक आणि डे-बुक उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.२८ वाजता दोघांना बेड्या ठोकल्या.ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सपोनि प्रशांत गंभीरराव, पोउपनि अभिजीत चिखलीकर, संतोष पारधे, नितीन घोडके, दीपक शिंदे, कैलास काकड, मनोज विखणकर, विजय निकम आणि संतोष चौरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.