Chhatrapati Sambhajinagar Crime | जप्त केलेला ट्रक तहसील कार्यालयातूनच लंपास; पोलिस बंदोबस्ताला आव्हान!

१६ टायर एलपी ट्रक चोरीला; १२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल गायब
तहसिलदारांनी पकडून आणलेला हाच ट्रक चोरीस गेला आहे.
तहसिलदारांनी पकडून आणलेला हाच ट्रक चोरीस गेला आहे.
Published on: 
Updated on: 

सिल्लोड : वाळू चोरीविरोधात कारवाई करून जप्त केलेला ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातही सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना सिल्लोडमध्ये उघडकीस आली आहे. तहसीलदारांनी दोन दिवसांपूर्वी पकडलेला १६ टायर एलपी ट्रक अज्ञात चोरट्यांनी थेट कार्यालयाच्या आवारातून पळवून नेला. विशेष म्हणजे, वाहनाच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात असतानाही ही चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० जीझेड ७८६० क्रमांकाचा ट्रक वाळू चोरीप्रकरणी जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला होता. त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होता. मात्र, कर्मचारी वॉशरूमला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ट्रक पळविला. चोरीस गेलेल्या ट्रकची किंमत १२ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रामभाऊ बोरडे, शहर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारातून, तेही पोलीस बंदोबस्तात जप्त वाहन चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे.

कारवाईचा गाजावाजा करणाऱ्या यंत्रणांकडून जप्त वाहनांची सुरक्षा राखण्यात झालेली ही त्रुटी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. बंदोबस्तातील हलगर्जीपणा झाला का, वाहन बाहेर जाताना कोणाचे लक्ष गेले नाही का आणि जबाबदारी कोणाची, याचा तपास होणे आवश्यक आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन ट्रक हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.