Chhatrapati Sambhajinagar : शहराला वाढीव पाण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा

डेडलाईन हुकली : पाणी योजनेच्या कामाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : शहराला वाढीव पाण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षाFile Photo
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar City waits a month for additional water

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदार कंपनीस १ जुलैची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, फारोळा येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने ही डेडलाईन हुकली आहे. खोदकामात काळा दगड लागल्याने उशीर होत असल्याचे ठेकेदार कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आता या कामासाठी विभागीय आयुक्तांच्या समितीने ठेकेदार कंपनीस एक महिन्याची मुदत वाढवून दिली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar Crime News ... अखेर साईबाबा पतसंस्थेच्या वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्या शहराच्या दोन नवीन पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे.

यातील एक योजना २७०० कोटी रुपयांची आहे. तर दुसरी ९०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनची पुनरुज्जीवन योजना आहे. पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत जायकवाडीपासून ९०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तर फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी १ जुलैची डेडलाईन देण्यात आली होती. परंतु हे काम पूर्ण झालेले नाही.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक ठार दोन गंभीर जखमी

जलश द्धीकरण केंद्राचे आतापर्यंत ८० टक्केच काम झाले आहे. उर्वरित कामासाठी खोदकाम करताना खाली काळा दगड लागल्याने उशीर होतो आहे, शिवाय तिथे जुन्या काही पाईपलाईन असल्यानेही काम संथगतीने करावे लागत आहे, असे ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी आज बैठकीत सांगितले. तसेच या कामासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर विभागीय आयुक्त पापळकर यांनी या कामासाठी एक महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यानुसार आता १ ऑगस्टपर्यंत ठेकेदार कंपनीस हे काम पूर्ण करायचे आहे.

नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला दररोज ७५ एमएलडी पाणी मिळू शकणार आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झालेले नसल्याने सध्या त्यातील सुमारे ३५ ते ४० एमएलडी पाणीच शहराला मिळत आहे. जुन्या जलश-द्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहराला पुरविले जात आहे. फारोळ्याचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र झाल्यानंतर या योजनेतून शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळू शकणार आहे.

शहराच्या दोन्ही पाणी योजनांच्या कामांचा आढावा घेतला. २७०० कोटींच्या पाणी योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. तर पुनरुज्जीवन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. फारोळ्याचे जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण करण्यात काही अडचणी उद्भवल्या आहेत. त्यामुळे त्या कामासाठी महिनाभराची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून शहराला वाढीव पाणी मिळू शकेल.
- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news