छत्रपती संभाजीनगर: बारावीच्या परीक्षेला जाताना कार उलटली, ५ विद्यार्थी जखमी

Chhatrapati Sambhajinagar News | बिलोली गावाजवळील घटना
 Chhatrapati Sambhajinagar News
बारावीच्या परीक्षेला जाताना बिलोली गावाजवळ कार उलटली.Pudhari Photo
Published on
Updated on

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा: बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या वाहनाला बिलोली गावाजवळील अपघात झाल्याची घटना आज (दि.११) घडली. या दुर्घटनेत एकूण ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाल्याने त्याच्यावर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर ४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याने ते उपचार न करताच वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले. (Chhatrapati Sambhajinagar News)

आजपासून बारावीच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली. लाख खंडाळा येथील परीक्षा केंद्रावर जात असताना बिलोली गावाजवळ विद्यार्थ्यांची गाडी पलटी होऊन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार किरकोळ जखमी विद्यार्थी हे उपचार न घेता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. जखमी सर्व विद्यार्थी खंडाळा गावातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते सकाळीच एका कार मधून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले होते.

 Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती शिवाजी महाराज पर्यटन सर्किट बनवण्याचे केंद्र सरकारने दिले आश्वासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news