छत्रपती संभाजीनगर : भाऊसाहेब चिकटगावकर शिंदेच्या सेनेच्या वाटेवर

Sambhajinagar Politics | उद्या मुंबईत पक्षप्रवेश
माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर
माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर Pudhari Photo
Published on
Updated on
नितीन थोरात

वैजापूर : वैजापूरच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर येत आहे. वैजापूर-गंगापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती पुढारीला मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (18 रोजी) मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यावर चिकटगावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे वैजापूरमध्ये ठाकरे गटाला बळकटी मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चिकटगावकरांना उमेदवारी न देता भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. या निर्णयामुळे नाराज झालेल्या चिकटगावकरांनी निवडणूक न लढता शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

त्यावेळी चिकटगावकरांनी स्वतः शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, कार्यकर्त्यांचे भवितव्य काय, याबाबत चर्चेला उधाण आले होते. आता मात्र त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चिकटगावकरांचा पक्षप्रवेश होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news