Chhatrapati Sambhajinagar crime : अपहरण करून अरबी शिक्षकाला मशिदीत नेले, रॉड, पट्ट्याने मारहाण, पाय फॅक्चर

छत्रपती संभाजीनगरात खळबळ
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बहिणीच्या घरून दुचाकीवर परतणाऱ्या एका ३३ वर्षीय अरबी शिक्षकाला रस्त्यात अडवून बळजबरीने दुसऱ्या दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर त्यांना रेल्वे स्टेशन भागातील एका मशिदीत नेऊन दांडा, लोखंडी रॉड आणि पट्टयाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या अमानुष मारहाणीत शिक्षकाचा पाय फॅक्चर झाला आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांत गुरुवारी (दि. १०) 'झिरोने गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळ सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तो पुढील तपासासाठी साताऱ्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Crime News
Gangapur bribery case : 'परत आल्यावर संपवून टाकतो'; लाचखोर हेड कॉन्स्टेबलची उपनगराध्यक्षांना धमकी

शेख नुमान शेख इरशाद, नादेर सिद्दिकी, काझी तजीम अहमद (तिघे रा. जहांगीरदार कॉलनी) आणि अल्ताफ (रा. सिल्क मिल कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मोहम्मद शोएब मोहम्मद महेमुद (३३, रा. आरटीओ ऑफिससमोर, जहांगीरदार कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, ते ८ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास बीड बायपास येथून त्यांच्या बहिणीच्या घरून मौसीन आरेफ खान यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते. ते महानुभाव चौकातील खलील पान टपरीसमोर आले असता, आरोपी शेख नुमान आणि नादेर सिद्दिकी यांनी त्यांना अडवले. आरोपींनी शोएब यांना बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसवले आणि रेल्वे स्टेशन चौकातील मशिदीसमोर आणले. तिथे इजाज काझी यांच्या दुकानासमोर त्यांना मारहाण करण्यात आली.

मशिदीत नेऊन अमानुष मारहाण

दुकानासमोर मारहाण केल्यानंतर आरोपींनी शोएब यांना थेट रेल्वे स्टेशन मशिदीच्या आत नेले. तिथे आधीचे दोन आणि काझी तजीम अहमद व अल्ताफ अशा चौघांनी मिळून शोएब यांना लाकडी दांड्याने, लोखंडी रॉडने, पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत शोएब यांच्या सर्व अंगाला मुक्का मार लागला आहे. त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीजवळ मोठी जखम झाली असून, डाव्या पायाच्या पोटरीजवळ गंभीर दुखापत होऊन त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे.

Crime News
Sambhajinagar school slab collapse : आधी मुलांना वाचवा, मग इमारत बांधा !

घटनेनंतर मोहम्मद शोएब यांनी वेदांतनगर ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी गुन्हा नोंदवून घेतला, मात्र, घटनास्थळ हे सातारा ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सातारा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news