बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या महिलेचे चोरट्यांनी ५० हजार लांबविले

Chhatrapati Sambhaji Nagar - सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वाळूज शाखेतील घटना
chhatrapati sambhaji nagar
बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या महिलेचे चोरट्यांनी ५० हजार लांबविलेfile photo
Published on
Updated on

वाळूज : गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतील ५० हजार रूपये लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.३०) भरदुपारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वाळूज शाखेत घडली. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दा खल केला आहे.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, ज्योती संजय पुडंगे (४०, रा. बकवालनगर) ह्या सोमवारी दुपारी सेंट्रल बँक ऑफ डियाच्या वाळूज शाखेत पैसे भरण्यासाठी आल्या होत्या. ५० हजाराचे दोन बंडल असे एकूण १ लाख रूपये फिक्स डिपॉझिट भरणा करण्यासाठी त्यांनी फार्म भरून बँकेतील कर्मचाऱ्याच्या हातात दिला. आणि पिशवीतील रोख रक्कम काढण्यासाठी पिशवीत हात घातला. त्यावेळी सदरची प्लॉस्टिकची पिशवी फाटलेल्या स्थितीत त्यांना दिसून आली. त्यांनी पिशवीची पहाणी केली असता पिशवी फाडून त्यामधील ५० हजाराचे एक बंडल गायब असल्याचे दिसून आले. आपले पैसे चोरट्यांनी गायब केल्याचे लक्षात येताच ज्योती पुडंगे यांनी तात्काळ वाळूज पोलिसांनी याची माहीती दिली.

माहिती मिळताच घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी उपनिरीक्षक रमेश राठोडसह कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे पैसे घेऊन बँकेतून पसार झाले होते. दरम्यान या शाखेत नेहमीच खातेदाराची पैसे काढण्यासाठी आणि भरण्यसाठी कायम गर्दी असते. इमारत लहान असल्याने जागा कमी पडत असून ग्राहकांना दाटीवाटीने बँकेत उभे रहावे लागते. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे बँकेत आलेल्या नागरिकांचे पैसे चोरी करीत आहेत. वरिष्ठांनी यात लक्ष घालून खातेदारांना चांगली सेवा देण्यासाठी व अशा घटना टाळण्यासाठी सुसज्ज इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे. देण्यासाठी व अशा घटना टाळण्यासाठी सुसज्ज इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.

या प्रकरणी ज्योती संजय पुडंगे यांच्या तक्रारीवरुन वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुदद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंमलदार शिंदे हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news