Chhatrapati Sambhaji Nagar |कन्नडमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर धडक कारवाई

रोख रक्कमेसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar |कन्नडमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर धडक कारवाई file photo
Published on
Updated on

कन्नड : शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच शाळेच्या १०० मीटर परिसरात विक्रीस मनाई असलेल्या सिगारेट व बिडींच्या अवैध साठवणूक व विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ लाख ३९ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई ८ जानेवारी रोजी रात्री ९.४८ वाजता करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सपोनि कुणाल सूर्यवंशी, उपनिरीक्षक डोईफोडे, कैलास निंभोरकर, नीलकंठ देवरे, पो ना गायकवाड या पोलिस पथकाने शहरातील गार का बंगला परिसरात छापा टाकला.

Chhatrapati Sambhaji Nagar
chhatrapati sambhaji nagar : वाळू तस्करांमध्ये दोन गटांत मध्यरात्री तुफान राडा

छाप्यावेळी शेख जमील शेख मुस्ताक व शेख खलील शेख मुस्ताक दोघेही रा. गार का बंगला, हे त्यांच्या राहत्या घरात अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, बिडी व सिगारेटची साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधित ठिकाण इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, काजी मोहल्ला, माळीवाडा कन्नड येथून अवघ्या १०० मीटर परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी पंचनामा करून विविध कंपन्यांचे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला गोल्ड फ्लॅक, मिन्ट स्विच, व रत्ना ब्रँडच्या सिगारेटचे बॉक्स, रॉयल पान तंबाखू, हिरा पान मसाला तसेच विक्रीतून मिळालेले २,९९,०१० रुपये रोख असा एकूण ८,३९,१९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाची माहिती औषध प्रशासन व अन्न सुरक्षा विभागास देण्यात आली असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ अधिनियम २००३ अंतर्गत कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news