Sambajinagar Crime: संभाजीनगर हादरलं! मुलाने टोकाचं पाऊल उचललं, वाचवायला गेलेल्या आईवडिलांचाही मृत्यू

Waluj Latest News: वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसरातील घटनेने शहर हादरला.
Sambhajinagar
SambhajinagarPudhari
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar Todays Crime News

सचिन जिरे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरुन पडून मृत्यू झाला. आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलांचा तोल गेल्याने डोंगरावरुन पडून मृत्यू झाला. तर मुलगा आणि पतीला डोंगरावरुन पडताना बघून आईनेही उडी मारली. या घटनेने संभाजीनगरात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी सकाळी एक तरुण आत्महत्या करण्यासाठी वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर पोहोचला होता. त्याची समजूत काढण्यासाठी आईवडीलही तिथे पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस कर्मचारी आणि आईवडील त्या मुलाची समजूत काढण्याच प्रयत्न करत होते. डोंगराच्या कडेला तो मुलगा थांबल्याने समजूत काढण्यापलीकडे इतर पर्याय नव्हता.

काही वेळाने त्या तरुणाने डोंगरावरुन उडी मारली. यादरम्यान त्याला वाचवायला गेलेल्या वडिलांचाही तोल गेला आणि दोघेही डोंगरावरुन खाली पडले. मुलगा आणि पती डोंगरावरुन पडल्याने बघून आईनेही उडी डोंगरावरुन उडी मारली. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे (मुलगा, 18 वर्ष), मुरलीधर चांदवडे (वडील), संगीता चांदवडे (आई) अशी या मृतांची नावे असून प्राथमिक अंदाजानुसार कुणाल हा नैराश्यात होता, असे समजते. घरगुती कारणावरुनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

तीन तासांचे अयशस्वी प्रयत्न

तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव हे घटनास्थळी उपस्थित होते. माध्यमांना त्यांनी प्रतिक्रियाही दिली. संजय जाधव म्हणाले, 'सकाळी आठच्या सुमारास कुणाल हा डोंगरावर आला. सुमारे तीन तास त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याची आई मुलाला विनंती करत होती. पण तरीही मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी दुपारास एकच्या सुमारास त्याने उडी मारली'.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news