

Sambhajinagar Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत तब्बल सहा वर्षानंतर मंगळवारी २३ व्या महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर यांनी ७० मते मिळवित एमआयएमचे अशोक हिवराळे यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी ७० मते मिळवून एमआयएमचे मोहंमद वसीम अहेमद यांचा पराभव केला.
निवडणुकीचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली. या निवडणुकीत ११५ पैकी १०३ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ठाकरे शिवसेना ६, वंचित बहुजन आघाडीचे ४ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १ असे ११ नगरसेवक तटस्थ राहिले. महापौर-उपमहापौर निवडीच्या या विशेष सभेला कॉंग्रेसच्या नगरसेविका मलिका कुरैशी या गैरहजर राहिल्या.
या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली. कोरोना महामारीनंतर महापालिका निवडणूका सतत लांबणीवर पडल्या होत्या.