छत्रपती संभाजीनगर : गुंतवणूकदारांनीच ‘त्‍या’ संचालकाला पकडून रात्री पोलिस आयुक्‍तालयात केले हजर

गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक
गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महिन्याला ७ टक्के परताव्याच्या आमिषाने गुंतवणुकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मे. आभा इन्वेस्टमेंट अँड लँड डेव्हलपर्सच्या अध्यक्ष, संचालकांविरूद्ध ४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात १० डिसेंबर रोजी रात्री गुंतवणुकदारांनीच एका संचालकाला पकडले. पैसे मागत त्याला मारहाण करीत पोलिस आयुक्तालयात नेण्यात आले. तेथे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी संचालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत नेले. सोमिनाथ नरवडे, असे गुंतवणुकदारांनी पकडलेल्या संचालकाचे नाव आहे, अशी माहिती एसीपी पाटील यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, रवी तुकाराम वीर (वय 35, रा. गल्ली क्र. 10, कामागार कॉलनी, चिकलठाणा) यांच्या फिर्यादीवरून संचालक पंकज शिवाजीराव चंदनशिव, पत्नी प्रियंका चंदनशिव यांच्यासह त्यांचे साथीदार शिवाजी रोडे, सोमिनाथ चंदनशिव, सोमिनाथ नरवडे आदींवर ५४ गुंतवणुकदारांची २ कोटी ३० लाख रूपयांना फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास करून मुख्य संशयीत आरोपी पंकज चंदनशिवचा तपास सुरू केलेला आहे. याशिवाय, सोमिनाथ नरवडे याला कलम ४१ नुसार नोटीस बजावलेली आहे. पोलिस बोलावतील तेव्हा तो हजर राहात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला थेट अटक केली नव्हती.

दरम्यान, काही गुंतवणुकदारांनी रविवारी सातारा परिरसरातील नरवडेचे घर गाठले. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी त्याच्यावर कारवाईच केली नाही, असे समजून गुंतवणुकदारांनी त्याला मारहाण केली. त्याच्याकडे पैशांची मागणी करीत अनेकांनी रस्त्यावरच त्याला बेदम चोपले. त्यानंतर नरवडेला पोलिस आयुक्तालयात नेले. तेथे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. धनंजय पाटील यांनी त्याला तत्काळ घाटीत दाखल केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news