पैठण: मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून कायदा हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी दावरवाडी येथील १९ मराठा आंदोलनकर्त्यांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मराठा समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले होते. त्यानुसार शनिवारी (दि. २४) सकाळी १०.२० ते ११.२५ या दरम्यान पैठण- पाचोड रोडवरील दावरवाडी फाट्यावर मराठा समाजाच्या तरुणांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.
यावेळी रस्ता रोखून घोषणाबाजी करून बेकायदा जमाव करून रहदारीला अडथळा निर्माण झाला. यामुळे पाचोड पोलीस ठाण्याचे अभिजीत सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी तपास केला.
तयानंतर दिगंबर सुधाकर तांगडे, शुभम शिवाजीराव गायकवाड, बाळू उत्तमराव तांगडे, धनंजय काकासाहेब तांगडे, महेश कल्याण जगताप, भारत तांगडे, मोहनराव, अनिल लक्ष्मण तांगडे, भीमराव त्र्यंबक तांगडे यांच्यासह इतर अनोळखी १० जण (सर्व रा. दावरवाडी, ता.पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि शरदचंद्र रोडगे करीत आहेत.
हेही वाचा