

Chhatrapati Sambhajinagar news
वैजापूर : तालुक्यातील कापूसवाडगाव येथे एरंडीच्या बिया खाल्ल्याने १३ लहान मुला-मुलींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१८) घडली. विषबाधा झालेल्या मुलांचे वय ३ ते १८ वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील काही मुलांनी एरंडीच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर त्यांनी या बिया गल्लीतील इतर मुलांनाही वाटल्या. बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
एकाच वेळी १३ मुलांना विषबाधा झाल्याने कापूसवाडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या सर्व मुलांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.