Sambhajinagar News : नोटीस, ना सूचना, थेट हातोडाच !

शहरातील ४९ कॅफेंवरील कारवाईनंतर व्यावसायिकांचा संताप : ही लोकशाही नव्हे, हुकूमशाही पद्धतीचा आरोप
Sambhajinagar News
Sambhajinagar News : नोटीस, ना सूचना, थेट हातोडाच !file photo
Published on
Updated on

Business owners outraged following action against 49 cafes in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ४९ कॅफेंवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाने मंगळवारी (दि. २३) केलेल्या संयुक्त कारवाईनंतर व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही पूर्वसूचना, नोटीस अथवा बोलण्याची संधी न देता हातोड्याने थेट तोडफोड करण्यात आल्याचा आरोप कॅफे चालकांनी केला असून, ही कारवाई लोकशाही व्यवस्थेऐवजी हुकूमशाही पद्धतीची असल्याची टीका त्यांनी केली आहे. या कारवाईत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोपही व्यावसायिकांकडून होत असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sambhajinagar News
IAS Avinash pathak : तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी!

महापालिका व पोलिस प्रशासनाने मंगळवारी रात्री शहरातील सिडकोतील कॅनॉट परिसर, टीव्ही सेंटर, दशमेशनगर, वेदांतनगरसह विविध भागांतील ४९ कॅफेंवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान कॅफेमधील टेंबल, खुर्चा, टीव्ही स्क्रीनसह भिंतीवर हातोडा चालविण्यात आला. मात्र, या कारवाईच्या पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कॅफे चालकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनाने कॅफे व्यावसायिकांची बैठक घेऊन विविध नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ब्लॅक फिल्म्स काढून पारदर्शक काचा बसविणे, सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवणे यासह आवश्यक बदल करण्यात आले होते.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News : मनपा, पोलिसांचा कॅफेंमध्ये धुडगूस

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनही कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिस व महापालिकेचे पथक हातात हातोडा घेऊन थेट कॅफेत घुसून अचानक कारवाई करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. कारवाईदरम्यान सर्व नियमबाह्य आस्थापनांवर समान निकष लावण्यात आले का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ठराविक कॅफेंवरच कारवाई करण्यात आली, तर इतरांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.

आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईमागील निकष आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत. या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने व्यावसायिकांची प्रतिमा मलिन झाल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे. तसेच कोणताही गैरप्रकार आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच, संबंधितांना आपल्याला बाजू मांडण्याची संधी न देणे आणि थेट तोडफोड करणे अन्यायकारक असल्याचे कॅफे चालकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news