Sambhajinagar ZP | छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा; अध्यक्षपदी अविनाश गलांडे, उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल बिनविरोध

दोन्ही शिवसेना गटांनी मतदानावर बहिष्कार टाकला
Chhatrapati Sambhajinagar ZP President Election
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश पाटील गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल Pudhari
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar ZP President Election

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवड प्रक्रियेदरम्यान सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला. भाजपने दोन्ही पदांवर निर्विवाद विजय मिळवत सत्ता आपल्या हाती घेतली आहे. अध्यक्षपदी अविनाश गलांडे, तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

अध्यक्षपदासाठी अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र जैस्वाल यांनीच उमेदवारी अर्ज घेतल्याने निवडणूक केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहिली. अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्याने दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाली.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Election
Sambhajinagar water supply project : जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

या प्रक्रियेदरम्यान दोन्ही शिवसेना गटांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे चुरशीची अपेक्षा असलेली ही निवडणूक एकतर्फी ठरली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचाली, सदस्यांची हालचाल आणि युतीसंदर्भातील चर्चांमुळे वातावरण तापले होते; मात्र अखेर भाजपने रणनीती यशस्वी करत सत्ता मिळवली.

विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने तुलनेने तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसले, तर बहिष्कारामुळे विरोधकांची ताकद कमी पडली. परिणामी जिल्हा परिषदेत भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news