भाजपचा डाव यशस्वी? सदस्य फोडत समीकरण बदलले; युतीचीही चर्चा

ठाकरे सेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांकडूनही भाजपलाच पाठिंबा राहणार असल्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींनी मंगळवारी (दि.१८) उशिरा नाट्यमय कलाटणी घेतल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखत असल्याचे चित्र होते. मात्र ऐनवेळी भाजपने आक्रमक चाल खेळत ठाकरे गटाचे दोन सदस्य आपल्या बाजूला वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या घडामोडीनंतर ठाकरे सेनेसमोर पर्याय उरला नसल्याने अखेर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ठाकरे सेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांकडूनही भाजपलाच पाठिंबा राहणार असल्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाल्याचे दिसत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी शक्यता पुढे येत आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र येत युतीच्या माध्यमातून अध्यक्षपद निश्चित करण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. याबाबत राज्य पातळीवर हालचाली वेगात सुरू असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावरही चर्चा सुरू असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

अध्यक्षपदाची लढत एकतर्फी होण्याची शक्यता

सर्व घडामोडी अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडत असून, शेवटच्या क्षणी बदललेल्या समीकरणांमुळे अध्यक्षपदाची लढत एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत घोषणा नसली तरी जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणात मोठी उलथापालथ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news