Marathwada Rain : बीड, धाराशिवला पावसाने झोडपले, दोन दिवसात ७२ जनावरे, चार व्यक्‍तींचा मृत्‍यू

विभागात ७५ मंडळांमध्ये अतिवृष्‍टी ७६ घरांची पडझड
Marathwada Rain
Marathwada Rain : बीड, धाराशिवला पावसाने झोडपले File Photo
Published on
Updated on

Beed, Dharamsiv lashed by rain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काहले आहे, गेल्या चोवीस तासांत विभागातील तब्बल ७५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान आणि घरांची पडझड झाली. पावसामुळे दोन दिवसांत ४ माणसे आणि ७२ जनावरेही दगावली आहेत. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ते बंद झाले आहेत.

Marathwada Rain
Sambhajinagar Crime : गाडीसमोर लघुशंका केल्याने वाद : प्लॉटिंग व्यावसायिकावर गोळीबार

जालन्यात ४ तलाव फुटले, ६ रस्त्यांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे मरातबाज्यात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. यात सहा ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत, ५ ठिकाणी पुलांचे नुकसान झाले. तर जालना जिल्ह्यातील ४ तलाव फुटले आहेत. यासोवतच संभाजीनगर जिल्ह्यात एका शाळेची पडझड झाली. तर खासगी मालमत्तांमध्ये मराठवाड्यात तब्बल ७६ घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६१ कच्च्‌या पवत्या घरांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात यंदा जुलै महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. आतापर्यंत जवळपास निम्म्याहून अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जूनपासून आतापर्यंत तब्बल १८ लाख हेक्टरवरील खरीपाची पिके नष्ठ झाली आहेत. आता परतीच्या पावसाने मराठवाडयावर अवकृपा केली असून, सतत मुसळधार पाऊस पडत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडील अहवालानुसार सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विभागात सरासरी ३१ मिमी पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात सरासरी ६३ मिमी, बीड जिल्ह्यात ४८ मिमी, जालना जिल्ह्यात २९ मिमी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ मिमी पाऊस झाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. वीड, धाराशिव जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. कित्येक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, रस्ते बंद झाले आहेत. घरांची पडझड झाली आहे. तसेच शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान नोंदविले गेले आहे.

Marathwada Rain
Sambhajinagar Rain : शहरासह परिसरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग

पुरात २२८ जण अडकले

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वडनेर, ढगपिंपरी, रुई वागे-गव्हाण येथे पुरात १९७ जण अडकले होते. यातील २७ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. वागेगव्हाण गावात अजूनही दीडशे लोक पुरात अडकले आहेत. यासोबतच बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातील सात्रा पोथरा, लिंबा रुई तसेच शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येलंब, कोळवाडी, टाकळवाडी, शिरापूर गात येथे ३१ लोक पुरात अडकले होते. नगर परिषद बचाव पथक व स्थानिक महसूल पथकांच्या सहकार्याने या सर्वांना सुम्परूरीत्या बाहेर काढण्यात आले.

दोन दिवसांतील नुकसान

पावसामुळे विभागात दोन दिवसांत वीज पढ्न, पुरात जाहून आणि इतर कारणांनी चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात लातूर जिल्ह्यात २, धाराशिव जिल्ह्यात १ आणि नांदेड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच ७२ जनावरे दगाबली आहेत. लहान मोठी ५९ दुधाळ जनावरे आणि १३ ओढकाम करणारी जनावरे यांचा यात समावेश आहे. सर्वाधिक जनावरे २१ जनावरे धाराशिव जिल्ह्यात दगावली आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात १६ जनावरांचा आणि जालना जिल्ह्यात १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून नुकसानीचा आढावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असून, आ-पत्ती व्यवस्थापन विभागाला मदतीचे आदेश दिले आहेत. लवकरच पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.

सिंदफणा नदीचे रौद्र रूप; मांजराही दुथडी भरून वाहू लागली

बीड: रविवारी रात्री बीड, पाटीदा, शिरूर, गेवराई या तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले, जिल्ह्यातील २९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नींद झाली असून, या पावसामुळे शिरुर शहरात पुरस्थिती निर्माण झाली. सिंदफणा नदीने रौद्र रूप धारण केले असून, या पुरामुळे शिरूरच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मांजरा नदीही दुथडी भरून वाहू लागली असून, संभाष्य भोका लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news