Bee Attack : वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा हल्ला, पर्यटकांची पळापळ

वेरूळ लेणी येथे रविवारी (दि.३) सकाळी पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली.
Bee Attack
Bee Attack : वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा हल्ला, पर्यटकांची पळापळfile photo
Published on
Updated on

Bee Attack at Ellora Caves Complex; Tourists Scramble to Flee

खुलातबाद, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ लेणी येथे रविवारी (दि.३) सकाळी पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या य ऐतिहासिक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Bee Attack
Kailash Caves : कैलास लेणीचे वैभव पाहण्यासाठी गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान लेणी क्रमांक १० आणि १६ परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. याच वेळी मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. पर्यटक लेणी पाहण्यात व्यस्त असताना अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अनेक जण घाबरून गेले आणि सैरावैरा धावू लागले.

पळापळ व घबराट हल्ल्यानंतर पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी लेणीबाहेर पळ काढला. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्ध पर्यटकांना बाहेर काढताना मोठी तारांबळ उडाली. यावेळी स्थानिक गाईड, हॉकर्स आणि लेणी सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविले.

Bee Attack
Devagiri Fort : देवगिरी किल्ला पुन्हा आगीच्या विळख्यात, दुर्मिळ वनस्पती, वन्यजीवांचे मोठे नुकसान

या घटनेत सुमारे ५० ते १०० पर्यटकांना मधमाशांचे किरकोळ डंख लागले असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. काही पर्यटकांना स्थानिक आरोग्य केंद्रातही हलवण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर लेणी परिसरातील सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news