मराठवाड्यात एटीएस, एनआयएची कारवाई; छत्रपती संभाजीनगर, जालना येथून तिघांना अटक

NIA ATS Raids | मराठवाड्यात पुन्हा दहशतवादी नेटवर्क उघड
NIA ATS Raids
मराठवाड्यात एटीएस, एनआयएची कारवाईfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. ते तिघेही दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी (दि. ४) रात्री एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. यात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात छापे टाकले. जालना येथील गांधीनगर येथून एकाला, छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौका जवळून एकजण आणि एन-६ परिसरातून एक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. त्यांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे. संबंधित तरुणांना ताब्यात घेतले असून तीनही ठिकाणी घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे संशयीत जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news