Chhatrapati Sambhajinagar hospital fire : व्हेंटिलेटरवरील बाळाला कवटाळून धावले 'ते' देवदूत !

एशियन हॉस्पिटलमधील मध्यरात्रीचा थरार; डॉक्टर, परिचारिकांच्या प्रसंगावधानाने ९ शिशूचे वाचवले प्राण, बचावकार्यामुळे ५८ रुग्णही सुरक्षित
Chhatrapati Sambhajinagar hospital fire
वॉर्डाला लागलेल्या आगीतून नवजात शिशूना सुरक्षित बाहेर काढताना कर्मचाऱ्यांची धावाधाव.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एशियन हॉस्पिटलमधील नवजात शिशु वॉर्डात अवघ्या काही दिवसांचे बालके व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर जगण्यासाठी धडपडत असतानाच शुक्रवारी मध्यरात्री २:१५ वाजेच्या सुमारास एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. काही क्षणांतच वॉर्डात धुराचे लोट वाढल्याने प्रचंड घबराट पसरली. मात्र, अशा अत्यंत कठीण वेळी कर्तव्यावरील डॉक्टर, परिचारिकांनी प्रसंगावधान दाखवले.

स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी 'मायेच्या कवचाने' त्या चिमुकल्यांना थेट हृदयाशी घट्ट कवटाळून पेटत्या वॉर्डातून सुरक्षित बाहेर काढले! दूसरीकडे आगीची माहिती मिळताच धाव घेतलेल्या नागरिकांनीही ५८ रुग्णांना उपचारासाठी सुरक्षित हलवले. या घटनेने रुग्णसेवा आणि माणुसकीचे सर्वोच्च रूप पाहिले.

Chhatrapati Sambhajinagar hospital fire
Nanded Crime : नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई
बालकांना उपचारासाठी इतरत्र रुग्णालयात हलवताना नागरिकांची माणुसकीही आली धावून.
बालकांना उपचारासाठी इतरत्र रुग्णालयात हलवताना नागरिकांची माणुसकीही आली धावून.

हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली तेव्हा वॉर्डात १ बाळ व्हेंटिलेटरवर, तर अत्यंत कमी वजनाची २ जुळ्यांसह इतर बालके ऑक्सिजनवर होती. रात्री २.१५ च्या सुमारास ए.सी. मध्ये स्पार्किंग होत असल्याचे एका परिचारिकेला दिसले. याची माहिती तातडीने डॉक्टरांनी दिली. मात्र, काही सेंकदाच आग व धुराचे लोट वाढल्याने रुग्णसेवेवर कर्तव्यावर असलेले डॉ. सय्यद अब्दुला, परिचारिका ज्योती रगडे, संध्या जाधव, समरीन पठाण, कल्पना नलावडे, अर्चना भालेराव आणि मावशी सुरेखा चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले.

व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या या अत्यंत नाजूक जिवांना या सर्व कर्मचा-यांनी आगीच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले. सर्व चिमुकल्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे घाटी रुग्णालय, एमजीएमसह खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. यासह जनरल वॉर्डातील ३६ आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांनाही सुरक्षितपणे बाहेर काढून खाजगी रुग्णालयांत हलवण्यात आले.

चिमुकल्यांच्या मदतीला धावून आलेले देवदूत.
चिमुकल्यांच्या मदतीला धावून आलेले देवदूत.

घटनेची माहिती मिळताच मनपा अग्निशमन दल आणि जवाहरनगर पोलिस प्रशासनाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. अचानक उ‌द्भवलेल्या या गंभीर परिस्थितही हॉस्पिटलमधील यंत्रणा आणि अग्रिशमन दलाच्या जवानांच्या मदतीने १५ ते २० मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. पोलिस व मनपा प्रशासनाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

परिचारिकेच्या पायाला दुखापत

शिशु वॉर्डात आग लागली तेव्हा बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कर्तव्यावरील डॉक्टर, परिचारिका सर्वांचीच धावाधाव सुरू होती. वॉर्डात नियुक्त मावशीनेही आग लागल्याचे सांगत सर्वांना सतर्क केले. बाळांचा जीव वाचविण्याच्या धावपळीत ज्योती रगडे या परिचारिकेच्या पायाला मार लागला. मात्र, त्याची पर्वा न करता त्यांनी तीन बाळांना आगीतून सुरक्षित बाहेर काढले.

Chhatrapati Sambhajinagar hospital fire
Manoj Jarange : छगन भुजबळांना लागली उतरती कळा

अर्ध्या रात्री रुग्णांच्या मदतीला माणुसकी धावली

आगीची माहिती समजताच रुग्ण नातेवाईक, नागरिकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यामुळे मध्यरात्री मोठी गर्दी झाली, सर्वांनीच बचावकार्यात आपापल्या परिने वाटा उचलला. रुग्णांना आगीतून सुरक्षित बाहेर काढण्यापासून ते उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यापर्यंत अनेक नागरिकांची धडपड सुरू होती. ३०रुग्णवाहिकांमधून रुग्णांना सुरक्षित हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news