

Ambulance hits divider, one killed, five injured
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : एका पॅरालिसिस पेशंटला उपचारसाठी घेऊन जात असताना मेंढीला वाचण्याच्या प्रयत्नात रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली. यात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. सात) रात्री साडेसात वाजता झाला.
श्रीराम शंकर काकडे (वय ७५, रा. पळशी, ता. सोयगाव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्रीराम शंकर काकडे यांना पॅरालिसिस झाल्याने त्यांना अंधारी (ता. सिल्लोड) येथे उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने (एम एच २० डी डी ०२९२) चालक अजिम पाशवी शेख व पेशंट केअर टेकर अर्जुन ढेपले हे छत्रपती संभाजीनगरला घेऊन जात होते.
खामगाव फाटा येथे मेंढीला वाचविण्याच्या प्रयत्नात रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली. यात रुग्णाचे नातेवाईक प्रभाकर श्रीराम काकडे, दिनकर श्रीराम काकडे, ताराबाई श्रावण काकडे आदी गंभीर जखमी झाले.
या जखमींना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे. या अपघाताची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान या अपघातामुळे या मार्गावर काही काही वाहतूक विस्कळीत झाली होती.