Ajanta Accident |अजिंठ्यात एसटीची अवजड ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी

मुखपाठ फाट्याजवळील घटना; पोलिसांसह नागरिकांची तातडीने मदत; सुदैवाने जीवितहानी टळली
Ajanta Accident
Ajanta Accident
Published on: 
Updated on: 

अजिंठा : अजिंठा येथील मुखपाठ फाट्याजवळ पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला पाठीमागून एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली. ही घटना सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाले. काही प्रवाशांच्या डोक्याला, नाकाला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणारी एसटी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३६) मुखपाठ फाट्याजवळ आली असता पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला (एनएल ०१ एल ७६१५) बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संतोष पाईकराव, संदीप कोथळकर, विलास सोनवणे, महिला पोलिस सुरेखा काळे, संजय कोळी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी अपघातानंतर तत्परता दाखवत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे, डॉ. अमोल गिरी, डॉ. महेश राठोड तसेच आरोग्य कर्मचारी सुरेश गव्हाणे, उज्वल वाघमारे, चित्रा हिरे, रोहित राव व नितीन गजबे यांनी तातडीने उपचार सुरू केले. जखमी प्रवाशांमध्ये काहींना डोक्याला, नाकाला, हाताला व पायाला दुखापत झाली आहे. अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Ajanta Accident
Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा आज दुसरा टप्पा

ब्रेक निकामी झाल्याचा चालकाचा दावा

अपघातानंतर एसटी बसच्या चालकाने बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले. मात्र, काही प्रवाशांनी बस निष्काळजीपणे चालविल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे या अपघातात बसचा चालक व वाहक दोघेही सुखरूप असल्याची माहिती आहे.

Ajanta Accident
Pitru Paksha : पितृपक्षात गिलके, अळूच्या पानांच्या मागणीत वाढ
पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news