

सागर भुजबळ
फर्दापूर : छत्रपती-सांभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात एसटी बस व आयशर ट्रक मध्ये समोरासमोर धडक होवून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात एसटी बसमधील ४० प्रवाशांसह चालक, वाहक व आयशर ट्रकमधील दोघे असे एकूण ४४ जण सुखरूप बचावले.
अपघातात एसटी बस व ट्रकचे नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवारी (दि.१५) सकाळी सात वाजेच्या सुमारास घाटातील अरुंद वळणावर घडला, असून अपघाता नंतर घाटात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली.
दौंड आगाराची जळगाव- बारामती ही बस जळगाव हुन बारामतीकडे जात असतांना शिरवळ पुणे येथून जळगाव कडे जात असलेल्या आयशर ट्रक सोबत घाटातील एका वळणावर बसची समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने घाटातील अरुंद मार्गावर अडकल्याने अजिंठा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.