Ajanta caves history | अजिंठ्याच्या इतिहासातील अमर प्रेमकथेचे स्मारक दुर्लक्षित

आज पारोचा १७० वा स्मृतिदिन, पर्यटक अनभिज्ञ
Ajanta caves history | अजिंठ्याच्या इतिहासातील अमर प्रेमकथेचे स्मारक दुर्लक्षित
Published on
Updated on

संजय जाधव

अजिंठा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणींच्या इतिहासाला वेगळे भावविश्व देणारे इंग्रज चित्रकार रॉबर्ट गिल आणि स्थानिक कन्या पारो यांची प्रेमकथा आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरते. देश, भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडणाऱ्या या प्रेमकथेची साक्ष देणारे पारोचे स्मारक मात्र आज दुर्लक्षामुळे ओसाड अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. पारोच्या १७० व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मारक परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Ajanta caves history | अजिंठ्याच्या इतिहासातील अमर प्रेमकथेचे स्मारक दुर्लक्षित
Sonalee Kulkarni | ‘अप्सरा’नंतर आली ‘मंजुळा’, ‘सालबर्डी’ चित्रपटात सोनाली नव्या रुपात

अजिंठा लेणींच्या संवर्धनासाठी आणि चित्रांकनासाठी ब्रिटिश सरकारकडून नियुक्त करण्यात आलेले चित्रकार रॉबर्ट गिल यांचे स्थानिक कन्या पारोसोबत प्रेमसंबंध जुळल्याची कथा इतिहासात नोंदली गेली आहे. पारोच्या निधनानंतर तिच्याविषयी असलेल्या उत्कट प्रेमातून आणि कृतज्ञतेच्या भावनेतून रॉबर्ट गिल यांनी २३ मे १८५६ रोजी अजिंठा येथील सध्याच्या पोलिस ठाणे परिसरात तिची कबर बांधल्याचे सांगितले जाते. या कबरीवर आजही “To the Memory of My Beloved Paro, Who Died 23rd May 1856” असा शिलालेख कोरलेला असल्याची माहिती स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे देतात.

Ajanta caves history | अजिंठ्याच्या इतिहासातील अमर प्रेमकथेचे स्मारक दुर्लक्षित
Annabhau Sathe memorial project : अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी जागा हस्तांतरित

मूलभूत सुविधांचा अभाव

लाखो रुपये खर्च करून सुशोभित करण्यात आलेला स्मारक परिसर गेल्या दोन वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दुर्लक्षित झाला आहे. परिसरात प्रकाश व्यवस्था असूनही रात्रीच्या वेळी स्मारक अंधारात बुडते, तर माहिती फलकांचा अभाव, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने देश-विदेशातून अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पारोच्या स्मारकाविषयी माहिती मिळत नाही. परिणामी, या ऐतिहासिक स्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Ajanta caves history | अजिंठ्याच्या इतिहासातील अमर प्रेमकथेचे स्मारक दुर्लक्षित
Sonalee Kulkarni | १५२ किल्ले परत आणणाऱ्या महाराणी ताराराणींची पराक्रमी कारकीर्द लोकांसमोर येणे गरजेचे : सोनाली कुलकर्णी

दिशादर्शक फलकाची आवश्यकता

छत्रपती संभाजीनगर–अजिंठा लेणी मार्गावर पारो स्मारकाकडे जाण्यासाठी कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने अनेक पर्यटकांना या स्थळाच्या अस्तित्वाचीही माहिती नसते. पर्यटन मार्गदर्शकांकडून माहिती मिळाल्यानंतरच काही पर्यटक या स्मारकाला भेट देतात. रॉबर्ट गिल आणि पारो यांच्या प्रेमकथेचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन २०१२ मध्ये प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते नितीन देसाई यांनी या प्रेमकथेवर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी लिहिली होती. त्यामुळे अजिंठ्याशी निगडित ही प्रेमकथा केवळ इतिहासापुरती मर्यादित न राहता साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातूनही लोकांपर्यंत पोहोचली.

Ajanta caves history | अजिंठ्याच्या इतिहासातील अमर प्रेमकथेचे स्मारक दुर्लक्षित
Sonalee Kulkarni | १५२ किल्ले परत आणणाऱ्या महाराणी ताराराणींची पराक्रमी कारकीर्द लोकांसमोर येणे गरजेचे : सोनाली कुलकर्णी

ऐतिहासिक स्मृतीस्थळाला योग्य सन्मान द्यावा

इतिहासाशी आणि अजिंठ्याच्या सांस्कृतिक वारसाशी संबंधित असलेल्या या स्मारकाकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच राज्य पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना इतिहास प्रेमींनी व्यक्त केली आहे. आज २३ मे रोजी पारोच्या स्मृतीला १७० वर्षे पूर्ण होत असताना संबंधित विभागांनी स्मारक परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक व माहिती फलक तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून या ऐतिहासिक स्मृतीस्थळाला योग्य सन्मान द्यावा, अशी मागणी नागरिक आणि इतिहास अभ्यासकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news