

Air services to Goa and Hyderabad to be temporarily suspended starting tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इंधन टंचाई आणि प्रवाशांचा घटना प्रतिसाद पाहता इंडिगो आणि एअर इंडियाने विविध मार्गावरील विमानसेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मंगळवार (दि. १६) पासून इंडिगो विमान कंपनीने गोवा, सायंकाळची हैदराबाद सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटणार आहे.
सध्या शहरातून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, गोवा आणि बंगळुरू या प्रमुख विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र काही सेवांमध्ये कपात करण्यात आली असून, काही उड्डाणे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. अजिंठा-वेरूळ, दौलताबाद, यांसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांचे प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. विमानसेवा कमी झाल्याने पर्यटकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो.
सक्षम हवाई संपर्काची गरज
विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सध्या प्रवासी प्रतिसाद, विमानांची उपलब्धता आणि संचालन खर्च यांचा आढावा घेऊन मार्गांचे पूनर्नियोजन करत आहेत. मात्र शहराच्या वाढत्या औद्योगिक आणि पर्यटन क्षमतेचा विचार करता विमानसेवा वाढविण्याची मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम हवाई संपर्क अत्यावश्यक असल्याचे मत विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.
इंडिगो विमानसेवा
गोवा मार्गावरील काही उड्डाणांत कपात, सायंकाळची हैदराबाद सेवा १६ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत बंद छत्रपती संभाजीनगर-नवी मुंबई ९ जुलै पासून दररोजची सेवा बंद करून ती मंगळवार, गुरूवार, शनिवार आणि रविवार अशी राहणार आहे.बंगलूरू - छ. संभाजीनगर जुलैपासून आठवड्यातून चार दिवसांऐवजी तीन दिवसच सेवा दिल्ली - छत्रपती संभाजीनगर, सकाळची विमानसेवा ९ जुलैपासून बंद विविध मार्गावरील सेवेत होणारा बदलया निर्णयामुळे इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानसेवेवर परिणाम होणार आहे.