Air India : एअर इंडियाकडून संभाजीनगर-दिल्ली विमानसेवेच्या वेळेत बदल

या बदलामुळे विमानाच्या येण्या आणि जाण्याच्या दोन्ही वेळा सुमारे २ तास ४० मिनिटांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Air India
Air India : एअर इंडियाकडून संभाजीनगर-दिल्ली विमानसेवेच्या वेळेत बदलfile photo
Published on
Updated on

Air India changes timings for Sambhajinagar-Delhi flight service

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एअर इंडियाने एक महिन्यासाठी संभाजीनगर-दिल्ली या सकाळच्या विमानसेवेच्या वेळेत बदल केला आहे. हा बदल १ आगस्टपासून पुढील एक महिन्यासाठी राहणार आहे. या बदलामुळे विमानाच्या येण्या आणि जाण्याच्या दोन्ही वेळा सुमारे २ तास ४० मिनिटांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या नवीन वेळामुळे आता दिल्लीला जाण्यासाठी दुपारच्या सत्रातच प्रवास करावा लागणार आहे. हा बदल तात्पुरता असून, १ सप्टेंबरपासून पुन्हा पूर्वीचे वेळापत्रक लागू होणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली.

Air India
Tiranga March : विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शहरात तिरंगा मार्च

सध्या दिल्लीहून सकाळी ६ वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल होते. त्यानंतर शहरातून सकाळी ८.४० वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेणारे हे विमान १ ऑगस्टपासून सकाळी १०.४५ वाजता संभाजीनगरला येईल, त ११.२० वाजता दिल्लीसाठी रवाना होईल. हे विमा दिल्लीत दुपारी सुमारे १.२० वाजता पोहोचेल.

बदलाचा परिणाम दिल्लीमार्गे इतर शहरांमध्ये किंव परदेशात जाणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. आतापर्यं सकाळी दिल्लीत पोहोचल्यामुळे अनेकांना दुपारपूर्वीच्य कनेक्टिंग फ्लाइट्स सहज मिळत होत्या. मात्र नव्य वेळापत्रकामुळे अनेक प्रवाशांना पुढील प्रवासा नियोजन बदलावे लागणार आहे.

Air India
Sanjay Shirsat : अभिजित दीपकेच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळवून देऊ

एअर इंडियाने हा बदन केवळ १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या महिनाभराच्य कालावधीसाठी लागू केला आहे. १ सप्टेंबरपासून पुन सध्याचे सकाळचे वेळापत्रक सुरू होईल, अशी माहित समोर आली आहे. हा बदल काही तांत्रिक कारणांमुळे करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

प्रवाशांनी ही घ्यावी काळजी

१ ऑगस्टनंतरचे तिकीट बुक करण्यापूर्वी उड्डाणाची वेळ तपासावी

कनेक्टिंग फ्लाईट असल्यास पुरेसा वेळ ठेवून नियोजन करावे

आधीच तिकीट आरक्षित केले असल्यास सुधारित वेळापत्रकाची खात्री करावी

प्रवासापूर्वी एअरलईनकडून मिळालेल्या संदेशांची पडताळणी करावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news