अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देऊन एयर होस्टेस विद्यार्थिनीवर बलात्कार

sexual assault : पैठण तालुक्यातील घटना
Chatrapati Sambhajinagar student assault
अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देऊन एयर होस्टेस विद्यार्थिनीवर बलात्कारFile Photo
Published on
Updated on

पैठण : पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका २१ वर्षीय विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देऊन पुणे येथे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पैठण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध शनिवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी पाठविणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांमध्ये अशा घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका ग्रामीण भागातील 21 वर्षीय तरुणीला चांगले शिक्षण मिळेल या हेतूने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथे शैक्षणिक आर्थिक खर्च लावून पालकाने एयर होस्टेस शिक्षण घेण्यासाठी पाठविले होते. परंतु या दरम्यान या तरुणीच्या मैत्रिणीचा भाऊ विजय आबासाहेब शिंदे रा. प्रभात कॉलनी वाकड जिल्हा पुणे या तरुणांसोबत ओळख झाली. काही दिवसांनी ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने या तरुणाने एयर होस्टेस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर दबाव टाकून आरोपी यांनी स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी देऊन या विद्यार्थिनी वर जबरदस्तीने डांगे चौक पुणे येथील लॉजवर व रुमवर बलात्कार करून यावेळी अश्लील व्हिडिओ काढला.

हा व्हिडिओ नातेवाईकांना दाखविण्याची वारंवार धमकी दिल्यामुळे पीडित तरुणीने प्रथम तक्रार वाकड पिंपरी चिंचवड पुणे येथील पोलीस ठाण्यात दाखल केली. हा गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी शनिवारी( दि.१८) रोजी रात्री पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे वर्ग केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news