

सिल्लोड : एका चार वर्षीय दत्तक घेतलेल्या चिमुकलीला आई बापानेच अंगावर चटके व डोक्यात मारून खून केल्याची खळबळजनक घटना दि.२७ गुरुवार रोजी सिल्लोड शहरातील मोगलपुरा या परिसरात घडली होती. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आयात शेख फहिम असे होते तर दत्तक घेतलेल्या आरोपीचे नाव शेख फहिम शेख अय्युब वय ३५ तर तिची पत्नी फौजिया शेख फहिम वय २७ रा अजिंठा हल्ली मुक्काम मोगलपुरा सिल्लोड असे आहे.
घटनेतील अटक करण्यात आलेल्या पती पत्नी या दोन्ही आरोपींना शहर पोलिसांनी सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक माहिती अशी की अजिंठा येथील रहिवासी व हल्ली सिल्लोड शहरातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या शेख फहिम शेख अय्युब, तिची पत्नी फौजिया शेख फहिम यांना चार मुलं असल्याने त्यांनी मुलगी हवी म्हणून सहा महिन्या अगोदर जालना येथील रहिवासी शेख नसीम अब्दुल कय्युम वय ३५ वर्ष याच्याकडून आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते. मात्र दि. २६ बुधवार रोजी रात्री पती पत्नी यांनी संगनमत करून आयात या मुलीला अंगावर चटके देऊन व डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारून ठार केले. आरोपींनी मुलीला का ठार केले हे अजून स्पष्ट झाले नसून याचा तपास पोलीस करीत आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुंडे हे करीत असून शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिल्लोड शहर पोलिसांनी आरोपी शेख फहिम शेख अय्युब व तिची पत्नी फौजिया शेख फहिम यांना दि.२८ शुक्रवार रोजी न्यायालयात हजर केले असता यावेळी नागरिकांनी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कुठलीही अनुचित घटना अप्रिय प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.