Sambhajinagar News : शिक्षक मृत्यू प्रकरणात दोन दिवसांत कारवाई

पालकमंत्री संजय शिरसाट यांचा दावा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शिक्षक मृत्यू प्रकरणात दोन दिवसांत कारवाईfile photo
Published on
Updated on

Action to be taken within two days in teacher's death case

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. मी याबाबत स्वतः पोलिस अधिक्षकांशी बोललो आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसांत योग्य ती कारवाई होईल, असा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी (दि. १४) केला.

Sambhajinagar News
Teacher's Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणातील टोळीला मध्यरात्री अटक आणि सकाळी जामीन

तीन दिवसांपूर्वी पोलिस आणि त्यांच्या सोबतच्या गुंडांच्या टोळीने केलेल्या मारहाणीत सुरेश बोरसे या शिक्षकाचा मृत्यू झाला. वैजापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी नागरगोजे व त्यांचे सहकारी हे ३०२ सारख्या गुन्ह्यातील आरोपी रवी आवारे व इतरांसोबत तपासासाठी वेरूळ येथे आले होते. यावेळी सुरेश बोरसे यांनी केवळ विचारपूस केल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांचा अटक केली होती.

परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका झाली. व्हिडिओत दिसणाऱ्या पोलिसांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे. याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही रविवारी आपली भूमिका मांडली.

वेरूळ येथील शिक्षकाच्या खुनाचे प्रकरण गंभीर आहे. त्यात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. कुणाचीही गाय केली जाणार नाही. मी या प्रकरणात पोलिस अधिक्षकांशी बोललो आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, असे शिरसाट म्हणाले.

Sambhajinagar News
कीर्तनाला जाणाऱ्या रिक्षालचालकासह कुटुंबीयांना मारहाण

रोहित पवारांचे उपोषण राजकीय स्टंट

सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत संजय शिरसाट म्हणाले, रोहित पवारांचे हा राजकीय स्टंट आहे. बरे झाले त्यांनी उपोषण केले, निदान आता तरी त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळेल. राज्यातील शेतकरी निश्चितपणे अडचणीत आहे. म्हणून राज्य सकारच्या त्यांच्या पाठीशी आहे. मध्यंतरी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले. आताही काही चुकत असेल तर निर्णय घेतले जातील, परंतु रोहित पवारांनी उपोषण न करता त्यासाठी संवाद साधावा, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वेरूळ येथे जाऊन पोलिस आणि आरोपींच्या टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेस जबाबदार आरोपी आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी खैरे यांनी केली. योग्य कारवाई न झाल्यास शिक्षक संघटनांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खैरे यांनी दिला.

वैजापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी नागरगोजे व त्यांचे सहकारी हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी रवी आवारे व इतरांसोबत तपासासाठी वेरूळ येथे आले होते. यावेळी सुरेश बोरसे यांनी केवळ विचारपूस केल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांचा अटक केली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका झाली. व्हिडिओत दिसणाऱ्या पोलिसांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वेरुळ येथे जाऊन बोरसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी पोलिस उपअधिक्षक अपराजिता अग्निहोत्री, पोलिस निरीक्षक राजपूत तसेच शिक्षक सेनेचे पदाधिकारी दत्ता पवार, नामदेव सोनवणे, बाळासाहेब जाधव, रावसाहेब अडाणे, ऋषिकेश पाटील यांचीही उपस्थिती होती.

हा गंभीर प्रकार पोलिस स्टेशनसमोर झाला, सीसीटीव्ही फुटेज आहे, तरीही कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने कारवाई नाही. उलट आरोपींचा जामीन झाला. यामागे मोठे षडयंत्र आहे, असे प्रथम दर्शनी वाटते, असा आरोप खैरे यांनी केला. ज्या लोकांनी हल्ला केला त्यांच्यावर तसेच त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना पाठीशी घातले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खैरे यांनी यावेळी दिला.

ऑपरेशन टायगर या केवळ वावड्या

ठाकरे गटाचे सात खासदार फुटून शिंदे सेनेत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. शिंदे सेनेचे केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनीही काल परभणी जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेला असल्याचे सांगितले होते, परंतु शिंदे सेनेचेच मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी हा दावा फेटाळून लावला. ऑपरेशन टायगरचा विषय हा केवळ प्रसिद्धी माध्यमातील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news