

सिल्लोड : तालुक्यातील उंडणगाव गटातीलही प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या माध्यमातून गटातील विविध गावांत रस्ते विकासासह पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली आहे. नव्याने मंजूर कामांना लगेच सुरुवात होणार असून उंडणगाव भागातील वाडी बस्ती तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
उंडणगाव गटातील विविध गावांत शिधापत्रिका धारकांना मोफत आनंदाचा शिधा वाटप तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य भांडे वाटप त्यांच्या हस्ते संपन्न झाले. तालुक्यातील उंडणगाव गटातीलही प्रत्येक गावाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे असे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, बाजार समितीचे संचालक कौतिक पा. मोरे, दामूअण्णा गव्हाणे, चेअरमन अब्दुल करीम, अंभईचे माजी सरपंच रामदास दुतोंडे, रईस देशमुख, प्यारेलाल जैस्वाल, सोनसिंग चव्हाण, बद्रीनाथ कोठाळे, राजाराम पाडळे, मोतीराम पाडळे, रोहिदास पवार, अशोक वाघमोडे, नानेगाव सरपंच फकिरा पठाण, अय्युब पठाण आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उंडणगाव गटातील अंबई, नानेगाव, जंजाळा, शेखपुर, पिंपळगाव घाट, उंडणगाव, खुल्लोड, केळगाव मुरडेश्वर, रेलगाव, आधारवाडी, को-हाळा, शिरसाळा, सिरसाळा तांडा, पांगरी, घाटांब्री यासह परिसरातील गावांतील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा तसेच गृहपयोगी साहित्य वाटप केले व संवाद साधला.