Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण ; दोन वर्षांनंतर घटना उघड

नूतन कॉलनीतील हॉस्टेलमधून पळवले; हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिकेनंतर अपहरण करणाऱ्यावर क्रांती चौक पोलिसांत गुन्हा
Crime News
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण ; दोन वर्षांनंतर घटना उघडFile Photo
Published on
Updated on

Abduction of a student preparing for a competitive examination; The incident was revealed two years later

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या एका तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची आणि तिला डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तब्बल दोन वर्षांपूर्वी (मे २०२४ मध्ये) घडली होती. तेव्हा बेपत्ता झाल्याची नोंद क्रांती चौक ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, मुलीचा शोध न लागल्याने अखेर वडिलांनी खंडपीठात धाव घेत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. त्यानंतर मंगळवारी (दि.२५) क्रांती चौक पोलिस ठाण्यात रोहित राजपूत या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Sambhajinagar News : गरवारे स्टेडियमच्या इनडोअर हॉलचे रूपडे पालटणार

चिखली (जि. बुलढाणा) येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीने (तरुणीचे वडील) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची २२ वर्षीय मुलगी ही मार्च २०२४ पासून छत्रपती संभाजीनगरमधील नूतन कॉलनी परिसरातील 'एका हॉस्टेल'मध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. ती नियमितपणे आपल्या आई-वडिलांशी संपर्कात होती.

मात्र, २८ आणि २९ मे २०२४ रोजी तिचे पालक तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना तिचा मोबाईल बंद येत होता. कुटुंबीयांनी हॉस्टेल मालकाला संपर्क साधला असता, तरुणी ही २५ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडल्याचे समजले. ती आपल्या गावी चिखली येथेही पोहोचली नाही. पालकांनी शहरात येऊन सर्वत्र शोधाशोध केली, पण तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतर क्रांती चौक ठाण्यात 'मिसिंग' नोंदवण्यात आली होती-

Crime News
MD Drugs Case : एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

मैत्रिणीच्या माहितीमुळे रोहित राजपूतचे नाव समोर तपासादरम्यान बेपत्ता तरुणीच्या एका मैत्रिणीकडून तिच्या कुटुंबीयांना महत्त्वाची माहिती मिळाली. रोहित राजपूत या तरुणाने या तरुणीला काहीतरी आमिष दाखवून आणि फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी शोधाशोध करूनही रोहित आणि या तरुणीचा शोध लागला नाही.

अखेर हताश झालेल्या वडिलांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 'हेबियस कॉर्पस' (बंदी प्रत्यक्षीकरण याचिका) दाखल केली. या याचिकेत रोहित राजपूतसह त्याच्या ६ नातेवाईकांना प्रतिवादी करण्यात आले होते. न्यायालयाच्या नियमित सुनावणीदरम्यान आरोपी रोहित व त्याचे नातेवाईक न्यायालयात हजर झाले नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रामकृष्ण काळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news