खराब रस्त्याने घेतला बळी; विजेचा धक्का लागून जखमी तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू

पैठणमधील मोती तांडा येथील घटना
Pramod Sampat Chavan
प्रमोद चव्हाण याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. Pudhari News Network
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील खेर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मोती तांडा येथील रुग्णांना रुग्णालयात जाण्या येण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे गुरुवारी (दि.१) सकाळी विद्युत शॉक लागलेल्या एका तरुण रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे नातेवाईकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Pramod Sampat Chavan
छ. संभाजीनगर : कडेठाण येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खर्डा गावाअंतर्गत असलेल्या मोती तांडा येथे आज सकाळी सात ते आठ च्या दरम्यान गावातील प्रमोद संपत चव्हाण (वय २५, रा. मोती तांडा, ता. पैठण) हा तरुण तांडा परिसरात असलेल्या विद्युत डीपीचा फ्युज टाकीत असताना विद्युत शॉक लागून जखमी झाला. तत्काळ या तरुणाला नातेवाईकांनी पैठण येथील रुग्णालयात आणण्यासाठी व्यवस्था केली. परंतु मोती तांडा ते खेर्डा या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी रस्ता अर्धवट दुरुस्ती केलेला असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने या रस्त्यावरून पायी जाणे देखील अवघड झाले.

Pramod Sampat Chavan
छ. संभाजीनगर : आॅनर किलिंग प्रकरणातील सासऱ्यासह आणखी एकाला अटक

तरुणाला तत्काळ उपचार न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

रस्ता नादुरुस्त असल्याकारणाने तांडा वस्ती परिसरातील नागरिकांना रुग्णालयात जाणेदेखील अवघड झाले. यामुळे मोती तांडा येथील तरुणाला तात्काळ योग्य उपचार न मिळाल्याने रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे परिसरात व नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदरील घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे व बीट जमादार चव्हाण यांनी करून घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news