धबधब्याखाली भिजताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

धारकुंड धारेश्वर येथील घटना; मृत तरुण सिल्लोड तालुक्यातील
Young Man Died Drowning In Waterfall
धारेश्वर येथील धबधबाPudhari Photo
Published on
Updated on

वरठाण : धारेश्वर येथील धबधब्याखाली अंघोळ करत असताना पाय घसरून कुंडात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि.२६) दुपारी एक वाजता घडली. गजानन राघु माने(वय.४०रा .केऱ्हाळा ता. सिल्लोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.सोयगाव तालुक्यातील धारकुंड धारेश्वर महादेवाचे तिर्थक्षेत्र असुन येथे तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असतो. या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

Young Man Died Drowning In Waterfall
असाही धबधबा, ज्याखाली सतत जळत असते आग!

यावेळी श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गजानन त्याच्या चार मित्रांसोबत आला होता. यावेळी धबधब्याखाली अंघोळ करण्यासाठी गजानन आणि त्याचे मित्र गेले होते. यावेळी गजाननचा पाय घसरला त्यानंतर तो तेथील मोठ्या कुंडामध्ये जावून अडकला. त्यानंतर बनोटी पोलीस चौकीत खबर दिल्यावरुन उपनिरीक्षक रज्जाक शेख जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, विकास दुबेले घटनास्थळी पोहोचले तेथे काही आलेले पर्यटकांनी कुंडात उतरुन सायंकाळी पाच वाजता गजानन माने चा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा मुलगीआई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news