

A nilgai that had fallen into a deep well in Golatgaon was rescued
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गोलटगाव परिसरात शनिवारी (दि.१७) सकाळी एका खोल विहिरीत नीलगाय पडल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे व वनपाल आपासाहेब तागड यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.
या मोहिमेत मॅन विथ इंडिज फाउंडेशनच्या वन्यजीव बचाव पथकातील आशिष जोशी, मयूर हसवाल, मनोज गायकवाड, मयूर रामेश्वरी यांनी खोल विहिरीत उतरून अत्यंत कौशल्याने नीलगायीला वर खेचून सुरक्षित बाहेर काढले. बचाव जीवन ठाकूर आणि स्थानिक शेतकऱ्यांचाही सक्रिय सहभाग होता.
बराच वेळ चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर नीलगाय सुखरूप बाहेर काढण्यात आली. रेस्क्यूनंतर नीलगायची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. पथकात वनरक्षक भागवत, वनसेवक स्पष्ट कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे तपासणीत झाल्यानंतर तिला पुन्हा सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या यशस्वी बचावामुळे वनविभाग, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण समोर आले असून स्थानिकांनी बचावकर्त्यांचे कौतुक केले.