छत्रपती संभाजीनगर : पोहण्याचा मोह जीवावर बेतला; खदानीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; खदानीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर : पोहण्याचा मोह जीवावर बेतला; खदानीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू pudhari photo
Published on
Updated on

चित्तेपिपंळगाव : पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२१) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. सार्थक कचरू फाटके (१३, रा गोकुळनगर चितेगाव ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक व गावातील त्याचे पाच मित्र नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे ५ वाजता व्यायाम करण्यासाठी जातं असल्याचे सांगून घराबाहेर पडले. व्यायाम झाल्यानंतर सार्थक व त्याचे मित्र चितेगाव परिसरात तांड्याच्या बाजूला डोंगरातील एका खदानीत पोहण्यासाठी गेले. यात सार्थकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, सोबतच्या असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत नागरिकांना बोलावले.

नागरिकांनी सार्थकला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासुन त्यास मृत घोषित केले. दुपारी ३ वाजता गोकुळनगर स्मशानभूमीत सार्थकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत.

अख्खे गाव धावले घटनास्थळी

झोपेतून उठत असतानाच नागरिकांना गावातील पाच सहा मुले व्यायाम करण्यासाठी गेली व पाण्यात बुडाली. अशी चर्चा ऐकायला मिळाली. माहिती मिळताच अख्खे गाव झोपेतून जागे होऊन घटनास्थळी धावले असता सार्थक हा एकटाच पाण्यात बुडाल्याचे दिसून आले.

बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन

बारा वर्षापूर्वीची सार्थक हा आईच्या गर्भात असताना त्याचे वडील कचरू फाटके यांचे अपघातात निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर सार्थकला आजोबांनी लहानचे मोठे केले. एक बहिणीच्या पाठीवर एकुलता एक असलेल्या सार्थक याचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने फाटके कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

Chhatrapati Sambhajinagar news
अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news