Sexual assault case : 80 वर्षीय महिलेवर नराधमाचा अत्याचार

आरोपीला सोयगाव पोलिसांनी अटक केली
Chatrapati Sambhajinagar Crime News
80 वर्षीय महिलेवर नराधमाचा अत्याचार(Pudhari File Photo)
Published on
Updated on

जरंडी : रात्रीच्या अंधारात घरात एकटी असलेल्या 80 वर्षीय महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील जरंडी येथे गुरुवारी (दि.5) रात्री अकरावाजेदरम्यान घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता एका विरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून, शुक्रवारी रात्री आठ वाजता आरोपीला सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी येथील 80 वर्षीय महिला घरात झोपलेली असताना शेख रमजान शेख मोहम्मद (54) याने रात्रीच्या अंधारात घरात घुसून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला.

Chatrapati Sambhajinagar Crime News
Kannad farmers protest : शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित

याप्रकरणी पीडित महिलेच्या नातीने दिलेल्या फिर्यादीवरून शेख रमजान शेख मोहम्मद विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.आरोपी शेख रमजान शेख मोहम्मद यास सोयगाव पोलिसांनी रात्री आठ वाजता अटक केली आहे .

पुढील तपास पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, अजय कोळी, संजय सिंघम आदी करत आहेत. गुरुवारी रात्री पीडित महिलेच्या घरात विसरलेला मोबाईल घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजता आलेला आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आल्याने संशयाची सुई निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

Chatrapati Sambhajinagar Crime News
Chatrapati sambhajinagar Crime : खंडणीसाठी मजुराचे अपहरण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news