छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना; दोन लाखांच्या नोटा जप्त

file photo
file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पुंडलिकनगर भागात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दोघांना अटक करून ५०० रुपयांच्या ४१९ बनावट नोटा असा २ लाख ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुकुंदवाडी भागातील मेडिकल सह इतर दुकानावर वापरण्यात आलेल्या नोटांवरून हे रॅकेट उघडकीस करण्यात आले आहे.

राहुल गौतम जावळे आणि देवेंद्र उर्फ भैया मोरे अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आतील राहुल जावळे हा बनावट नोटांची छपाई करायचा तर देवेंद्र मोरे हा अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन वेगवेगळ्या दुकानांमध्ये या बनावट नोटा चालवायचा, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे यांनी दिली आहे.

शुक्रवारी 27 ऑक्टोबरला परिमंडळ 2 चे पोलीस उप आयुक्त शिलवंत नांदेडकर यांना संजयनगर कमान मुकुंदवाडी भागात काही मुले 500 रुपयांचे बनावट नोटा ह्या ख-या नोटा असल्याची बतावणी करुन मेडीकल दुकाने, किराणे दुकानावर चालवित आहे खात्रीलायक माहीती मिळाल्याने त्यांनी त्यांचे कार्यालयाचे पोलीस उप निरीक्षक हरीष खटावकर व पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांना सदर माहीतीची खात्रीकरुन कार्यवाहीचे आदेश दिले.

त्यावरुन परिमंडळ-२ कार्यालायचे पोलीस उप निरीक्षक हरीष खटावकर व मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे विशेष पथकाचे पोउपनि घुनावत त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी नमुद भागात जावुन बातमीत नमुद वर्णानांचे मुलांचा शोध घेतला असता संजयनगर मुकुंदवाडी कमानी जवळ व संजयनगर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्या जवळ चार अल्पवयीन मुले व १ सज्ञान मुलगा देवेंद्र उर्फ भैय्या मोरे असे पाच मुले 500 रुपये दराच्या 19 बनावट नोटां बाळगतांना मिळुन आले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांना बनावट नोटांचा पुरवठा करणाराचे नाव पत्ता माहीत नसुन फक्त त्याचा मोबाईल नंबर असल्याची माहीती मुलांनी दिल्याने पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे पोलीस अंमलदार गणेश वैराळकर यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे तपासात संजयनगर येथील मुलांकडुन मिळालेल्या मोबाईल क्रमांक धारकाचा आनंदनगर पुंडलिकनगर परिसरात शोध घेऊन बनावट नोटा पुरवठा करणार इसम राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परीसर) यास नमुद गुन्ह्यात अटक करुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात 500रुपये दराच्या एकुण 400 बनावट नोटा मिळुन आल्यात. सदर गुन्ह्यातील दोघा सज्ञान आरोपीतांना न्यायालयाने तिन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि झनकसिंग नरसींग घुनावत हे करीत आहेत.
ही करवाई पोलीस आयुक्त डॉ. . ज्ञानेश्वर चव्हाण ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ शिलवंत नांदेडकर , सहा.पोलीस आयुक्त, डॉ. श्रणजीत पाटील उस्मानपुरा विभाग, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि हरीष खटावकर, पोउपनि झनकसिंग घुनावत, सफौ आम्ले, सफौ नरसिंग पवार, पोह बाबासाहेब कांबळे, पोह प्रकाश गायकवाड, पोना गणेश वैराळकर, पोना विनोद गिरी, पोना सुखदेव जाधव, पोअं समाधान काळे, पोअं अनिल थोरे, पोअं गणेश वाघ, पोअं संदिप वैद्य पोअं गोकुळ खटावकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news