कन्नड नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हे

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अडथळा ठरू नये म्हणून नगरपरिषदेने मिरवणूक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी चार वाजता नगरपरिषदेच्या पथकावर तिघांनी हल्ला केला. कन्नड शहर पोलिस ठाकन्नड नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हेण्यात डॉ. शेख खलील, शेख रफीक महंमद, शेख नजिम महंमद रा. कन्नड शहर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी शेख खालीद बदीयोद्दीन यांनी फिर्याद दिली की, शहरातील न्यायालयासमोर रस्त्यावरच तीन पत्र्याची दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले होते.प्रशासक नंदकिशोर भोंबे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीत अतिक्रमण काढण्याचा मुद्दा उपस्थित झाला.त्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली.न्यायालयासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी उप मुख्याधिकारी शेख खालीद बदीयोद्दीन,क्षेत्रीय अधिकारी प्रमोद तुपे, मुकेश रजोरा, मोहन पंडित, वाल्मीक शिरसाट, गोपाळ घावरी हे गेले असता त्यांच्यावर डॉ.शेख खलील,शेख रफीक महंमद,शेख नजिम महंमद यांनी हल्ला केला.शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.यावरून या तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे,जिवे मारण्याचा प्रयत्न करणे वरून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.नगरपरिषदेच्या पथकाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन खटके, हेड कॉन्स्टेबल सी.एम.बेग करत आहेत.