पैठण येथील खुले कारागृहातील कैदी बांधवांचा गणेश उत्सव | पुढारी

पैठण येथील खुले कारागृहातील कैदी बांधवांचा गणेश उत्सव

पैठण; पुढारी वृत्तसेवा : गणेश उत्सव म्हटला की सर्व बालगोपाला सह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी महिला वेगवेगळ्या समाजातील गणेश भक्त या उत्सवामध्ये सहभाग घेऊन आपला आनंद साजरा करतात. असाच गणेश उत्सवाचा आनंद खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेले पैठण येथील खुले कारागृहातील विविध धर्मातील कैदी बांधवांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर श्रीगणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे या उत्सवासाठी कारागृहाचे अधीक्षक धनसिंग कावळे, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे, पोलीस हवालदार कदम यांचे मार्गदर्शन मिळत असून या श्रीगणेश उत्सवामुळे खुले कारागृह परिसरातील कैदी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या फुलाने सजावट करून या ठिकाणचे वातावरण भक्तीमय केले आहे. दररोज नित्यनेमाने सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी वास्तव्यास असलेले व जन्मठेप शिक्षा झालेल्या कैदी बांधवाकडून आरती, भजनासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीगणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व कैदी कर्मचारी यांच्या सहभागातून महाप्रसाद वाटप करून या उत्सवाची सांगता कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात येते.

Back to top button