ढोरकिन परिसरात छापा टाकून २८ किलोची गांजाची झाडे जप्त

Chhatrapati Sambhajinagar | एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Dhorkin area cannabis plants
ढोरकिन परिसरात एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २८ किलोची गांजाची झाडे जप्त केली. Pudhari Photo
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरकिन शिवारातील एका शेतामध्ये गांजाचे झाड लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर आज (दि.३०) दुपारी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी महसूल व पोलीस पथकासह छापा मारून मच्छिंद्र रावसाहेब मुळे यांच्या शेतातील २८ किलो २२ गांजाची झाडे जप्त केली.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांना ढोरकिन शिवारातील मच्छिंद्र रावसाहेब मुळे यांची शेती गट क्रमांक १२५/१ यामध्ये गांजा झाडांची लागवड केल्याची गोपनीय खबर प्राप्त झाली होती.

त्यानंतर तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांना माहिती देऊन सपोनि ईश्वर जगदाळे व पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सापळा रचून शासकीय पंचासह महसूल पुरवठा विभागाचे निरीक्षक कैलास बहुरे, तलाठी सोनवणे, पोलीस ऑफ निरीक्षक संभाजी झिंजुर्डे, पोलीस जमादार राजेश चव्हाण, करतातसिंग सिंगल, गणेश खंडागळे, सोनवणे, दाभाडे, उगले, घोडके यांच्यासोबत शेतात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी गांजाचे झाडे आढळून आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Dhorkin area cannabis plants
छत्रपती संभाजीनगर : वरठाण तलावाच्या सांडव्यास गळती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news