

छ. संभाजीनगर: विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने दि. २२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी छ. संभाजीनगर येथे होणार्या १९ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचे उद्घाटन दि. १९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सत्यशोधक समाज कार्यालय, १६२, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केला आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलनाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते होणार आहे. तर या सोहळ्याच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी (राज्याध्यक्षा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) या असणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर ढमाले (राज्य संघटक) विद्रोही कवयित्री प्रतिभा अहिरे, प्रा. रामप्रसाद तौर, अर्जुन बागूल, आदींची उपस्थिती आहे.
या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. भारत सिरसाट, कॉ. भीमराव बनसोड, राजानंद सुरडकर, अनंत भवरे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, चंद्रशेखर शिखरे, अॅड. वैशाली डोळस, रतनकुमार साळवे, अमरदीप वानखडे, सुदाम मगर, अरविंद खैरनार, डॉ. बालाजी जाधव, डॉ. सुधाकर नवसागर, डॉ. मधुकर दिवेकर, विवेकानंद सुकाळे, वसुधा कल्याणकर, अॅड. संघपाल भारसाखळे, ग.ह. राठोड, डॉ. सागर चक्रनारायण, डॉ. विनय हातोले, भाऊसाहेब जाधव, डॉ. संजय पाईकराव, डॉ. उमाकांत राठोड, जितेंद्र भवरे, सुनिल उबाळे, सुधाकर निसर्ग आदींनी केले आहे.