Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे सोळाव्या दिवशी उघडेच

धरणात ९९ टक्के साठा, गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग
Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे सोळाव्या दिवशी उघडेच File Photo
Published on
Updated on

18 gates of Jayakwadi Dam remain open on the 16th day

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील दिवसापासून कमी अधिक मोठ्या जायकवाडी धरणात गेल्या सोळाव्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाचे १८ दरवाजे अद्याप उघडेच आहेत. शुक्रवारी (दि.५) रात्री नऊ वाजेदरम्यान गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली.

Jayakwadi Dam
Sambhajinagar Crime : ड्रग्स तस्करांची नारेगाव, बुढीलेनला पोलिसांनी काढली धिंड

धरणाच्या वरील भागात सतत पाऊस पडत असल्याने येथील जायकवाडीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी सायंकाळी धरण नियंत्रण कक्षात नोंद केल्याप्रमाणे वरील धरणांतून १२ हजार क्युसेक आवक सुरू होती. धरणातील पाण्याची टक्केवारी ९८.५५ नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेला धरणात पाण्याची टक्केवारी ९०.८८ होती.

वरील भागातून येणारी आवक लक्षात घेऊन जायकवाडी धरणात पाण्याची टक्केवारी ९९ कायम ठेवून उपलब्ध आवक गोदावरी नदीत विसर्ग करण्याचे नियोजन सध्या पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी धरणाच्या वरील भागात व तालुक्यात पाऊस पडल्यामुळे शनिवारीही चांगल्या पद्धतीने राहील. सोळा आवक ाजे कमी जास्त प्रमाणावर उघडेच रा-हणार, अशी स्थिती आहे.

Jayakwadi Dam
Sambhajinagar Political : घुसखोरी नव्हे, मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत : जरांगे यांचे भुजबळांच्या टीकेला उत्तर

प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा

गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून जायकवाडीतून गोदावरीत विसर्ग सोडण्यात आलेला आहे. नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीचे नुकसान झालेले आहे का, याबाबतचा आढावा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायव तहसीलदार राहुल बनसोडे यांनी गोदावरी नदीकाठावर असलेल्या गावांचे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडून घेतला आहे.

पोलिस उपअधीक्षकांच्या सूचना

धरणातून मोठ्या प्रमाणावर गोदा-वरीत विसर्ग सुरू असल्याने विविध गावांच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणपतीमूर्ती गोदा-वरी नदीत विसर्जन करू नये. आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news