नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष गाडीच्या १६ फेऱ्या

उन्हाळ्यात प्रवाशांना मिळणार दिलासा
Nanded-Hazrat Nizamuddin special train
नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष गाडीच्या १६ फेऱ्याfile photo
Published on
Updated on

16 trips of Nanded-Hazrat Nizamuddin special train

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड- हजरत निजामुद्दीन-हुजूर साहिब नांदेडदरम्यान १६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष रेल्वेमुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीतून दिलासा मिळणार आहे.

Nanded-Hazrat Nizamuddin special train
गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे

ही विशेष गाडी ११ एप्रिल ते ३० मे २०२६ दरम्यान प्रत्येक शनिवारी हुजूर साहिब नांदेड येथून सकाळी ८:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या कालावधीत एकूण ८ फेऱ्या चालविण्यात येतील.

ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून ११, १८, २५ एप्रिल आणि २, ९, १६, २३ आणि ३० मे रोजी धावेल. या साप्ताहिक विशेष गाडीचे आरक्षण ५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आले आहे.

Nanded-Hazrat Nizamuddin special train
Bajaj Pune Grand Tour: हिंजवडीतून ‘बजाज पुणे ग्रँड टूर-2026’चा शानदार प्रारंभ

तसेच हजरत निजामुद्दीन नांदेड ही गाडी १२ एप्रिल ते ३१ मे दरम्यान प्रत्येक रविवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री ९:४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २: ३५ वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीच्या देखील ८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून १२, १९, २६ एप्रिल आणि ३, १०, १७, २४व ३१ मे रोजी धावेल.

या मार्गाने धावणार

या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट आणि मथुरा या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबतील. या गाड्यांत २ एसी, ३ एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास असे २४ कोचेस असतील, ज्यामुळे उन्हाळ्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news