Chhatrapati Sambhajinagar : रेल्वेच्या हायटेन्शन तारेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना अडकलेला चेंडू काढताना घडली घटना
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : रेल्वेच्या हायटेन्शन तारेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

10-year-old boy dies after being shocked by high-tension railway wire

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा क्रिकेट खेळताना रेल्वेच्या बोगीवर चेंडू अडकला. तो काढण्यासाठी वर चढलेल्या दहा वर्षीय मुलाला हायटेंशन तारेचा स्पर्श होऊन शॉक लागल्याने तो गंभीररीत्या भाजला. ही घटना गुरुवारी (दि.१०) रेल्-वेस्टेशनच्या मालधक्का येथे घडली. उपचारादरम्यान रविवारी (दि. १३) मुलाचा मृत्यू झाला. अयान सलीम शेख (१०, रा. राहुलनगर, सादातनगर) असे मृत मुलाचे नाव आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Ashadhi Ekadashi : एसटीला विठुराया पावला : गतवर्षीपेक्षा जास्त उत्पन्न

अधिक माहितीनुसार, अयान हा त्याच्या मित्रांसोबत रेल्वे स्टेशनच्या बीड बायपासकडील गेटच्या आवारात मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी त्यांचा चेंडू रेल्वे स्टेशनच्या आत उभा असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या वरच्या भागात अडकला. त्यामुळे ही सर्व मुले स्टेशनच्या आवारात पोहोचली.

चेंडू काढण्यासाठी त्यांनी अयानला वरच्या बाजूला चढण्यासाठी मदत केली. तो वर चढताच त्याला माल धक्क्याच्या वरच्या बाजूला असलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागला. त्यामुळे तो काही काळ चिकटून भाजल्या गेला व बाजूला फेकला गेला.

Chhatrapati Sambhajinagar
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण @ ७६ टक्के, साठा ८० टक्के झाल्यावर माजलगावला पाणी सोडणार

ही बाब त्याच्या अन्य मित्रांनी धावत जाऊन परिसरातील लोकांना सांगितली. त्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news