

गौतम बचुटे/केज : आज (दि. २३) रात्री ९:३० च्या सुमारास केज कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळ दोन मोटार सायकलींची समोरासमोर धडक झाली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी हे दोघेही केज तालुक्यातील असून त्यांपैकी एक कोठी तर दुसरा मांगवडगाव येथील असल्याचे कळते. दरम्यान या रस्त्याने जात असलेले बलभीम बचुटे आणि रितेश बचुटे यांनी अपघाताची माहिती रुग्णवाहिका व पत्रकार यांना दिल्याने अपघातग्रस्तांना लवकर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.