Beed News | अजित पवार यांच्या स्वागताच्या बॅनरने माजलगावात एकाचा बळी

बॅनर बाजूला करताना विजेच्या तारांचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू
Beed News
अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरने माजलगावात एकाचा बळी file phto
Published on
Updated on

माजलगाव : माजलग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसामान्य यात्रेवेळी लावण्यात आलेले स्वागताचे बॅनर बाजूला करताना विजेच्या तारांचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. २) रात्री ११ वाजता ही घटना घडली. गौतम सरपटे (वय २५) रा. केसापुरी कॅम्प असे मृत तरूणाचे नाव आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसामान्य यात्रा १ ऑक्टोबर रोजी माजलगावात मंगलनाथ मैदानावर घेण्यात आली. यानिमित्त अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आले होते. एक बॅनर माजलगाव धरणाच्या कमानी समोर पडले होते. सदर बॅनर उचलून बाजूला ठेवत असताना विद्युत तारांना स्पर्श झाल्याने गौतम सरपटे याला विजेचा धक्का बसला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news